संतापजनक! 4 काकांनी मिळून 15 वर्षीय भाचीवर केला सामूहिक बलात्कार; तोंडात कोंबला कापूस अन्.. | Rajasthan Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan Alwar Crime News

बलात्कारानंतर पीडितेला 4 दिवस कैदही ठेवण्यात आलं होतं. या घटनेनंतर गुरुवारी कुटुंबीयांनी रामगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Rajasthan Crime News: संतापजनक! 4 काकांनी मिळून 15 वर्षीय भाचीवर केला सामूहिक बलात्कार; तोंडात कोंबला कापूस अन्..

राजस्थानमधील अलवरमध्ये (Rajasthan Alwar) माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आलीये. इथं चार काकांनी एका 15 वर्षीय अल्पवयीन भाचीवर सामूहिक बलात्कार केला.

बलात्कारानंतर पीडितेला 4 दिवस कैदही ठेवण्यात आलं होतं. या घटनेनंतर गुरुवारी कुटुंबीयांनी रामगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेनं एफआयआरमध्ये सांगितलं की, मला 4 दिवस ओलीस ठेवल्यानंतर आरोपींनी बंदुकीच्या जोरावर माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तोंडात कापूस कोंबून व हातपाय बांधून ही घटना घडवली. पोलिसांनी मुलीच्या जबाबावरून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: Sharad Yadav Passed Away : तब्बल 25 वर्षाचं वैर संपवून मोदींचा पराभव करण्यासाठी शरद-लालू आले होते एकत्र!

या प्रकरणाला दुजोरा देताना पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'मुलगी तिची आई आणि भावजयांसह पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली.

तक्रारीनंतर, पॉक्सो कायद्याच्या कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याला या प्रकरणाची चौकशी करण्याचं काम सोपवण्यात आलंय.'

हेही वाचा: CM Shinde : सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर

एफआयआरमध्ये म्हटलंय की, काका कामासाठी त्यांच्या घरी घेऊन गेले होते. त्यादरम्यान मुलीचं कुटुंबीय हरियाणा इथं कमाईसाठी गेलं होतं.

मुलीनं सांगितलं की, माझ्या लहान काकांनी आपल्या पत्नीला मुलांसह तिच्या माहेरी पाठवलं होतं आणि रात्री चार काकांनी मिळून माझ्यावर बलात्कार केला.

तोंडात कापूस भरून हात पाय बांधल्याचा आरोपही पीडित अल्पवयीन मुलीनं केलाय. मुलीच्या आईनं फोन केला असता, काकांनी तिला बोलू दिलं नाही, असंही ती म्हणाली.