
CM Eknath Shinde: सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर
Nashik-Shirdi Highway Accident : नाशिक-शिर्डी महामार्गावर (Nashik-Shirdi Highway Accident) आज (शुक्रवार) पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दुःख व्यक्त केलंय.
हेही वाचा: Nashik Accident News : सिन्नर शिर्डी महामार्गावर बस व ट्रक ची धडक झाल्याने भिषण अपघात
या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून
हेही वाचा: Nashik News : मीनाताई ठाकरे उद्यानात स्वच्छता मोहीम; उद्यानातील खेळण्यांची लवकरच दुरुस्ती!
या अपघाताचं वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त, तसंच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमी प्रवाशांना तातडीनं शिर्डी-नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत, तसंच हा अपघात नेमका कशामुळं झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
हेही वाचा: Nashik Crime News : मालेगावी हरणाचे मांस जप्त; एका संशयिताला अटक