esakal | बापरे! नदीकाठावर भांडी घासणाऱ्या मुलीचा मगरीच्या झडपेत जागीच मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

crocodile

मच्छुंद्री नदीकाठावर भांडी धुवत असताना तिच्यावर मगरींनी झडप घातली आणि फरपटत खोल पाण्यात नेलं.

बापरे! नदीकाठावर भांडी घासणाऱ्या मुलीचा मगरीच्या झडपेत जागीच मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वाघ, सिंह, मगर अशा हिंस्त्र प्राण्यांची प्रत्येकालाच भीती वाटते. यांचा एखाद्यावर हल्ला होणे म्हणजे जीवालाच मुकणे, हे समीकरणच आहे. आजवर जंगली भागाच्या जवळ राहणाऱ्या अनेकांचा मृत्यू अशा हिस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झाला आहे. अशीच एक ताजी घटना गुजरातमध्ये पहायला मिळाली आहे. गीरचे जंगल हे वन्यजीवांसाठी ओळखले जाते. बुधवारी गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील गीर (पश्चिम) वन्यजीव विभागातील बाबरिया रेंजमध्ये एका घटनेने अनेकांचे हृदय पिळवटून निघाले आहे. 

या भागात मगरीने एका 15 वर्षांच्या मुलीवर हल्ला केला आहे. आणि या झालेल्या हल्ल्यात या मुलीचा मृत्यू झाला आहे. या मुलीचा मृतदेह महत्प्रयासाने मच्छुंद्री नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. हिरल वाघ असं या मुलीचं नाव आहे. मच्छुंद्री नदीकाठावर भांडी धुवत असताना तिच्यावर मगरींनी झडप घातली आणि फरपटत खोल पाण्यात नेलं. याबाबत वनअधिकाऱ्यांनी म्हटलंय की, हिरल ही नदीकाठावर भांडी घासत होती. तेंव्हा मगरीने तिच्यावर हल्ला केला आणि तिला पाण्यात घसटत नेलं. काही तासांनी तिचा जखमी मृतदेह आढळून आला. दुष्यंत वासवदा या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. 

हेही वाचा - 50 शिरच्छेद, मृतदेहांचे तुकडे, गाव भस्मसात, महिलांवर लैंगिक अत्याचार; ISIS चा अमानुष हल्ला

गीर जंगलात माळधाराच्या 46 वसाहतींपैकी पोपटडी एक आहे. मालधारी हे पारंपारिक वनवासी असून गुरांचे प्रजनन करुन आपले जीवन जगतात. त्यांना गीर जंगलात चरायला हक्क आहेत. गीर जंगलाच्या काठावर मच्छुंद्री धरण ओलांडल्यानंतर पोपटडी नेस आहे. या नदीच्या पाण्यात भरपूर मगरी आहेत, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. या नदीत असणाऱ्या मगरींच्या अस्तित्वाविषयी मालधरांना माहिती आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्या मुलीला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

हेही वाचा - Bihar Election: 'हा काही शेवट नाही', पराभवानंतर शत्रुघ्नपुत्र लव सिन्हांची प्रतिक्रिया

मगरीला ओळखणे कठीण जातं. पण आम्ही नदीकाठावर मगरींना पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावले आहेत. या मगरींना पकडून आम्ही मानवी वस्तीपासून दुर सोडून येतो, असंही त्यांनी सांगितलं आहे.