esakal | 50 शिरच्छेद, मृतदेहांचे तुकडे, गाव भस्मसात, महिलांवर लैंगिक अत्याचार; ISIS चा अमानुष हल्ला  
sakal

बोलून बातमी शोधा

isis

आतापर्यंत 2017 पासून ISIS च्या दहशतवाद्यांनी तब्बल 2000 हून अधिक जणांची हत्या केली आहे.

50 शिरच्छेद, मृतदेहांचे तुकडे, गाव भस्मसात, महिलांवर लैंगिक अत्याचार; ISIS चा अमानुष हल्ला  

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ISIS या दहशतवादी संघटनेचा हाहाकार संपूर्ण जगभर पहायला मिळतो. इस्लामिक कट्टरतावादी असणारी ही संघटना संपूर्ण जगभरात दहशत पसरवण्यास कारणीभूत ठरली आहे. संपूर्ण मानवजातीलाच ISIS सारख्या दहशतवादी संघटनांमुळे धोका निर्माण झाला आहे. इस्लामिक कट्टरतावादाचा अलिकडीलच एक नमूना म्हणजे फ्रान्समध्ये झालेले दहशतवादी हल्ले. त्या घटना ताज्या असताना आता आणखी एक चित्तथरारक अशी अमानुष घटना समोर आली आहे. अफ्रिकेमधील मोझँबिक देशामध्ये इस्लामिक स्टेटच्या या दहशतवाद्यांनी हा नृशंस प्रकार केला आहे. 

ISIS च्या दहशतवाद्यांनी एका गावातील तब्बल 50 जणांचा एकावेळी खात्मा केला आहे. त्यांचा शिरच्छेद करुन त्यांना मारण्यात आलं आहे. हा प्रकार आहे कँबो डेलगाडो राज्यातील नांजबा या गावातला. ही घटना घडलीय एका फुटबॉलच्या मैदानामध्ये. या मैदानात या 50 जणांना मारल्यानंतर दहशतवादी तिथेच शांत बसले नाहीत. तर त्यांनी त्या 50 जणांच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे करुन ते जंगलात फेकून दिले आहेत. मानवी समाजाला काळीमा फासणारी ही घटना ठरली आहे. या प्रकारानंतर या दहशतवाद्यांनी या गावातील महिलांचे अपहरणही केले आहे. त्यांचं अपहरण करुन त्यांना देहविक्रीसाठी वापरण्यासाठी ताब्यात घेतलं आहे. 

हेही वाचा - अभिमानास्पद! बायडेन यांच्या टीममध्ये 20 पेक्षा अधिक भारतीय वंशाचे व्यक्ती

याबाबतचं वृत्त बीबीसीने दिले आहे. गावातील 50 जणांची हत्या केली. त्यानंतर गावातील महिलांना देहविक्रीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर दहशतवाद्यांनी संपूर्ण गावालाच आग लावली आहे. या आगीमुळे गावातील बहुतांश घरे खाक झाली आहेत. दहशतवाद्यांनी हा अमानवी प्रकार करताना घोषणाही दिल्या. घोषणा देतच त्यांनी गावांत प्रवेश केला. गावातील घरांना आग लावली. हे कृत्य करताना विरोध करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली.  या साऱ्या प्रकारात गावातील युवक-युवती बळी पडले आहेत. याचं कारण असं सांगण्यात येतंय की त्यांनी ISIS मध्ये सहभागी होण्यास नकार दिला. आणि म्हणून हा सारा नृशंस  प्रकार दहशतवाद्यांनी घडवून आणला आहे. अनेकांना मारल्यानंतर काहींचे मृतदेह तुकडे करुन जंगलात टाकले तर काही नातेवाईकांना दफनविधीसाठी पाठवण्यात आले. 

हेही वाचा - निवडणुकीनंतर पहिल्यांदाच समोर आले डोनाल्ड ट्रम्प, पराभव न स्विकारण्यावर अजूनही ठाम

कैबो डेलगाडो हे राज्य नैसर्गिक वायूच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र आतापर्यंत 2017 पासून ISIS च्या दहशतवाद्यांनी तब्बल 2000 हून अधिक जणांची हत्या केली आहे. या साऱ्याच्या भीतीमुळे चार लाख 30 हजारहून अधिक लोकांनी हे राज्य सोडूनच दुसरीकडे स्थलांतर केले आहे. यापूर्वी मार्च महिन्यातही असाच प्रकार पहायला मिळाला ज्यात अशाचप्रकारे 50 जणांचा शिरच्छेद करण्यात आला. 

loading image