
जवळपास 39,000 मतांनी लव्हा सिन्हा यांचा पराभव झाला आहे.
Bihar Election: 'हा काही शेवट नाही', पराभवानंतर शत्रुघ्नपुत्र लव सिन्हांची प्रतिक्रिया
पाटणा : बिहार निवडणुकीचा निकाल 10 तारखेला लागला. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरली. मतमोजणीपूर्व अंदाजात महागठबंधनच्या बाजूने कौल होता, मात्र प्रत्यक्ष निकालात पुन्हा एकदा एनडीएच्याच बाजूने जनमत दिसून आले. मात्र, तेजस्वी यादवांनी नितीश यांना कडवी झुंज दिली आणि जेरीस आणलं हे स्पष्ट दिसून आलं. या निवडणूकीत शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव सिन्हादेखील उभे राहिले होते. मात्र, त्यांचा पराभव हा शेवट नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
लव सिन्हा बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर बाकींपूर मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यांनी भाजपाकडून तीनवेळा आमदार राहिलेल्या नितीन नविन यांच्याविरोधात ही निवडणूक लढवली होती. जवळपास 39,000 मतांनी त्यांचा पराभव झाला आहे. असं असलं तरीही लव सिन्हा यांनी हा शेवट नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलंय की, मी कशातून जातोय याची मला कल्पना आहे. मी अशा पक्षाविरोधात लढत दिलीय जे जिंकण्यासाठी काहीही करु शकतात. शत्रुघ्न सिन्हा यांच्यासाठीही हा पराभव पचवणे अवघड आहे. कारण लव यांचा पराभव हा त्यांच्या कुटुंबातील सलग तिसरा पराभव आहे.
हेही वाचा - VIDEO - हत्तीच्या पिलाचा पहिला बड्डे; सेलिब्रेशनसाठी आले 15 हत्ती
बांकीपूर हा मतदारसंघ पाटणा साहीब या लोकसभा मतदारसंघाजवळच येतो ज्या जागेवरुन शत्रुघ्न सिन्हा हे 2009 ते 2019 दरम्यान खासदार राहिलेले आहेत.
त्यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी लखनऊमधून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्या हरल्या.
लव सिन्हा यांनी म्हटलं की, मला कल्पना आहे की बांकीपूर या जागेवरुन निवडणूक लढवणं तितकं सोपं नव्हतं. यासाठी खुप ताकदीची आवश्यकता होती. आणि पहिल्याच प्रयत्नात 44,000 मते मिळवणे चांगलेच आहे. या जागेवर 22 जणांनी निवडणूक लढवली होती. लव यांनी 43,908 मते प्राप्त करुन दुसरे स्थान पटकावले तर स्वयंघोषित मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असणाऱ्या पुष्पम प्रिया चौधरी या 5,176 मतांनी तिसऱ्या स्थानावर राहिल्या आहेत.
हेही वाचा - Bihar Election: बिहारमध्ये कोणते स्टार चमकले अन् कोण हरले
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, लवने अगदी संपुर्ण ताकदीनिशी हा लढा दिला. पण काही हातात नसणाऱ्या गोष्टींबाबत तुम्ही काही करु शकत नाही. राजद आणि काँग्रेसने मतमोजणीमधील घोळाबाबत केलेल्या आरोपाचा हवाला देत त्यांनी म्हटलं.
त्यांनी असंही म्हटलं की, त्याच्यासाठी मी फार प्रचार केला नव्हता. आणि काँग्रेसच्या तिकीटावर लढणे हा सर्वस्वी त्याचाच निर्णय होता. लोकांच्या आग्रहाखातर आणि काँग्रेसच्या आग्रहाखातर ही निवडणूक लढवली गेली. कुणीतरी मला ट्विटरवर विचारलं की हा शेवट असेल का? पण हा शेवट कसा असू शकतो? भाजपा सत्तेपासून कितीतरी वर्षे बाहेर होती. पण काय तो शेवट होता का? मग हा कसा असू शकतो? असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.
Web Title: Its Definitely Not End Said Shatrughan Sinhas Son Luv Sinha After Losing Bihar Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..