जम्मू-काश्‍मीरमध्ये तीन दहशतवादी ठार 

जम्मू-काश्‍मीरमध्ये तीन दहशतवादी ठार 

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारले, तर या वेळी एक जवान हुतात्मा झाला. चकमकीत दोन जवान जखमीही झाले. 

कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये या चकमकी झाल्या. दहशतवाद्यांबाबत गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर जवानांनी कुलगाममधील रेडवानी भागात शोधमोहीम सुरू केली होती. या वेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी मारले गेले. हे दोघेही लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनचे सदस्य होते. या दोघांविरोधात अनेक गुन्हे नोंद होते. या गोळीबारात तीन जवान जखमी झाले.

जखमींपैकी एकाला उपचारांदरम्यान हौतात्म्य आले. दुसऱ्या एका घटनेत पुलवामामधील त्राल भागातही चकमक होऊन जवानांनी एका दहशतवाद्याला मारले. शकीर हसन दार असे या दहशतवाद्याचे नाव असून, तो अन्सर गझवतुल हिंद या "इसिस'शी संबंधित संघटनेचा सदस्य होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com