

Shanaya Bisht
Esakal
गाझियाबादच्या गौर सिद्धार्थम सोसायटीत मंगळवारी सायंकाळी १६ वर्षीय मुलीने १५ व्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. टोकाचं पाऊल उचलण्याआधी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात दहावीच्या अभ्यासाचा तणाव असल्याचाही उल्लेख करण्यात आलाय.