दिल्ली: फटाका कारखान्याच्या आगीत 17 मृत्युमुखी 

वृत्तसंस्था
रविवार, 21 जानेवारी 2018

एका फटाका कारखान्याला लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचाव मोहीम राबविण्यात येत असून, कारखान्यामध्ये आणखी काही लोक अडकल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. 

नवी दिल्ली : दिल्लीच्या बवाना औद्योगिक वसाहतीतील दोन मजली फटाका कारखान्याला लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाल्याची भीती दिल्ली अग्निशामक दलाच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली; तर पोलिसांनी 9 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. 

एका फटाका कारखान्याला लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचाव मोहीम राबविण्यात येत असून, कारखान्यामध्ये आणखी काही लोक अडकल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. 

आज सायंकाळी 6.20 वाजण्याच्या सुमारास कारखान्याला आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाल्यानंतर 10 गाड्या तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाल्या. उत्तर दिल्लीच्या महापौर प्रीती अगरवाल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: 17 killed after blaze engulfs firecracker factory in Delhi