
उन्हाचा फटका! एप्रिलमध्ये घरगुती एसींची विक्री 17.5 लाखांवर
नवी दिल्ली : कडाक्याच्या उन्हात देशातील बहुतांश भागात एअर कंडिशनरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. केवळ एप्रिलमध्ये सुमारे १७.५ लाख एसी (Air Conditioner) विकले गेले आहेत, तर २०२२ मध्ये एकूण आकडा ९० लाखांच्या पुढे जाईल, असा अंदाज कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस असोसिएशनने (CEMA) व्यक्त केला आहे. CEMA ही व्हाइट गुड्सच्या विक्रीवर देखरेख ठेवणाऱ्या संस्था आहे. (AC Sale In India)
हेही वाचा: राज ठाकरेंवर गुन्हा; वसंत मोरे तिरुपती बालाजीला रवाना
एप्रिलमध्ये 17.5 लाख एसींची विक्री आतापर्यंतची सर्वात मोठी मानली जात आहे. मात्र, एअर कंडिशनरशी संबंधित काही उत्पादनांच्या तुटवड्यामुळे उत्पादकांना येत्या काही महिन्यांत वाढती मागणी पूर्ण करणे शक्य होणार नाही, अशी चिंता संघटनेने व्यक्त केली आहे. देशभरात वाढत्या तापमानामुळे आणि उन्हाच्या तीव्रतेने वेळेपूर्वीच भीषण रूप धारण केल्याने एसीच्या मागणीत विक्रमी वाढ झाल्याचे प्रमुख कारण मानले जात आहे.
एप्रिल 2022 मध्ये, एसीच्या 17.5 लाख युनिट्सची विक्री केवळ घरांमधील वातानुकूलित उपकरणांची असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी दुप्पट असून, एप्रिल 2019 च्या तुलनेत ही वाढ सुमारे 30-35 टक्क्यांनी जास्त आहे. मे-जूनमधील एसीची विक्रीही नवे विक्रम प्रस्थापित करू शकते, असा अंदाज सीईएमएचे अध्यक्ष एरिक ब्रैगांजा यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा: Video : घाटकोपरचे मनसे नेते महेंद्र भानुशालींना पोलिसांकडून अटक
या कंपन्यांच्या एसीला मोठी मागणी
Voltas, Panasonic, Hitachi, LG आणि Haier या सारख्या कंपन्यांच्या AC च्या विक्रीत गेल्या महिन्यात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. याबाबत व्होल्टासचे सीईओ प्रदीप बक्षी म्हणाले की, “एप्रिल 2022 मध्ये एसी उद्योगाने मागील वर्षाच्या आधीच्या महिन्याच्या तुलनेत विक्रीमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवली गेली आहे. तर, हिताचीची ब्रांड कंपनी जॉनसन कंट्रोल्स-हिताची एयर कंडीशनिंग इंडियाची विक्री एप्रिल 2021 च्या तुलनेत जवळपास दुप्पट झाल्याचेही व्हाइट गुड्सने म्हटले आहे.
Web Title: 175 Lakh Ac Sales Amidst During Heat Wave In India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..