Video : घाटकोपरचे मनसे नेते महेंद्र भानुशालींना पोलिसांकडून अटक| MNS | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video : घाटकोपरचे मनसे नेते महेंद्र भानुशालींना  पोलिसांकडून अटक

Video : घाटकोपरचे मनसे नेते महेंद्र भानुशालींना पोलिसांकडून अटक

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला आजपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला असून, उद्यापासून ज्या ठिकाणचे भोंगे उतरवण्यात आलेले नसतील त्या ठिकाणी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठन करण्याचा इशारा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आता मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली असून, घाटकोपरचे मनसे नेते महेंद्र भानुशाली (Mahendra Bhanushali) यांना अटक करण्यात आली आहे. भानुशाली यांच्या कार्यालयातून पोलिसांनी भोंगे जप्त केले आहेत. (Mumbai Police Detain Mahendra Bhanushali)

मनसेतर्फे राज्यभर उद्यापासून भोंगे उतरण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी सावध पवित्रा घेत राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे उद्यापासूनचे आंदोलन नेमकं कशा स्वरुपाचे असेल याबद्दल अद्याप मनसेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, सकाळी पहिल्या अजानपासून मनसे मशिदींसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसाचे पठन करून आंदोलनाची सुरुवात करू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. याच सर्व घडामोडी लक्षात घेत पोलिसांकडून योग्य ती पाउलं उचललील जात आहे.

हेही वाचा: राज ठाकरेंना अटक होऊ शकते का?, वाचा कायदा काय सांगतो

राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी घेतलेल्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटी शर्तींचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अनेक अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपनिरीक्षक गजानन इंगळे यांच्या फिर्यादीवरून राज ठाकरे यांच्यासह राजीव जेवलीकर आणि।इतर संयोजक यांच्याविरोधात कलम ११६,११७,१५३ भादवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ नुसार सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना स्पष्ट निर्देश

महाआरतीवर मनसैनिक ठाम

मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणू नये म्हणून मुंबई पोलिसांनी सोमवारी मनसे (MNS) कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर आज पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनादेखील नोटिसा देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. परंतु, नोटिसा दिल्या तरी महाआरती होणारच असल्याचे पुणे मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांची सांगितले असून, राज ठाकरे यांचा आदेश आहे पाळण्यात येणार आहे.

Web Title: Mumbai Police Arrest Mns Leader Mahendra Bhanushali From Ghatkoper

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top