नोटाबंदीनंतर बँकेत पैसे भरणाऱ्या 18 लाख जणांना नोटीस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

प्राप्तिकर विभागाच्या माहितीप्रमाणे या कालावधीत 18 लाख करदात्यांनी 4.17 लाख कोटी रुपये बँकेत जमा केले आहेत. या 18 लाख करदात्यांवर प्राप्तिकर विभागाची नजर आहे. त्यामध्ये पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा केलेल्यांचाही समावेश आहे. आतापर्यंत 18 लाख जणांना एसएमएसद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर बँकेत जमा झालेल्या पैशांवर सरकारची नजर असून पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा करणाऱ्या 18 लाख जणांना या रकमेबाबत खुलासा करण्याच्या सूचना शासनाच्या नव्या सॉफ्टवेअरमधून एसएमएसद्वारे देण्यात आल्या आहेत.

प्राप्तिकर विभागाच्या 'ऑपरेशन क्‍लिन मनी' अंतर्गत नोटाबंदीनंतर बँकेत जमा झालेल्या रकमेबाबत माहिती घेण्यात येत आहे. 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करणाऱ्या 18 लाख जणांना त्याबाबतचा खुलासा करण्याच्या सूचना एसएमएसद्वारे करण्यात आल्या आहेत. एसएमएसशिवाय ई-मेलद्वारेही विचारणा करण्यात आली असून दहा दिवसांत खुलासा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आठ नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात बँकेत पैसे जमा झाले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या माहितीप्रमाणे या कालावधीत 18 लाख करदात्यांनी 4.17 लाख कोटी रुपये बँकेत जमा केले आहेत. या 18 लाख करदात्यांवर प्राप्तिकर विभागाची नजर आहे. त्यामध्ये पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा केलेल्यांचाही समावेश आहे. आतापर्यंत 18 लाख जणांना एसएमएसद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच आणखी मेसेजेस पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी दिली.

Web Title: 18 lakh messages sent asking clarification