केरळमध्ये पूर-पावसामुळे आत्तापर्यंत 180 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 12 ऑगस्ट 2018

राज्य पोलिस दल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल आणि इतर बचावपथकाकडून या पूरग्रस्तांसाठी आणि राज्यातील जनतेला मदत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबतची माहिती घेण्यासाठी आम्हाला फोन केला. यादरम्यान पंतप्रधानांनी आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे सांगितले.

- पी. विजयन, मुख्यमंत्री, केरळ

नवी दिल्ली : केरळ, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालसह 16 राज्यांमध्ये येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने (एनडीएमए) आज (रविवार) दिली. तसेच केरळ राज्यात मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे आत्तापर्यंत सुमारे 180 जणांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सांगितले, की राज्य पोलिस दल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल आणि इतर बचावपथकाकडून या पूरग्रस्तांसाठी आणि राज्यातील जनतेला मदत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबतची माहिती घेण्यासाठी आम्हाला फोन केला. यादरम्यान पंतप्रधानांनी आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे सांगितले.

भारतीय हवामान खात्याने एका बुलेटिनच्या माध्यमातून सांगितले, की उत्तराखंडच्या दूरदराजच्या क्षेत्रात रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मासेमाऱ्यांनी या भागात मासेमारी करु नये, असा सल्लाही देण्यात आला आहे. 

दरम्यान, केरळमधील जनतेला मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. तसेच या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात आत्तापर्यंत सुमारे 180 जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 180 deaths due to flood and rains in Kerala