अठरावी लोकसभा देशाला अग्रेसर ठेवेल - नरेंद्र मोदी

Narendra-Modi
Narendra-Modi

नवी दिल्ली - व्यक्तीच्या जीवनात १६ ते १८ ही अत्यंत महत्त्वाची वर्षे (१० वी १२ वी) असतात. त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या इतिहासातही १६ ते १८ व्या लोकसभांचे कार्य ऐतिहासिक ठरणार आहे, त्यातही सध्याच्या १७ व्या लोकसभेने तर आताच (पहिल्या दीड वर्षातच) इतिहासात स्थान पक्के करण्यासारखी कामगिरी केली आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले. नियोजनानुसार २०२४ मध्ये अस्तित्वात येणारी १८ वी लोकसभाही देशाला नव्या दशकात अग्रेसर ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका करेल असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजधानीच्या डॉ. विश्‍वंभरदास मार्गावर (बी.डी मार्ग) खासदारांसाठी बांधलेल्या ७६ सुसज्ज फ्लॅट्‌स्‌च्या तीन बहुमजली इमारतींचे उद््घाटन पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला आदी सहभागी झाले होते. या रस्त्यावरील जुने ८ बंगले पाडून गंगा, यमुना व सरस्वती या ३ बहुमजली व देखण्या इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येकी ४ बेडरूम, स्वतंत्र देवघर, दोन बाल्कन्या, स्वतंत्र कार्यालय, प्रत्येकी चार स्वच्छतागृहे, कर्मचाऱ्यांसाठी वेगळी स्टाफ क्वार्टर्स आदींनी सुसज्ज असे हे फ्लॅटस्‌ असतील. 

‘क्रिया सिद्धी सत्त्वे भवति महतां नोपकरणे'' म्हणजेच कोणत्याही कामाची पूर्तता आमच्या सत्य संकल्पावरच अवलंबून असते असे उदाहरण देऊन पंतप्रधान मोदी म्हणाले, की डॉ. आंबेडकर स्मृती भवनासह अटलजींच्या सरकारच्या काळात आखलेल्या तसेच युद्ध व पोलिस संग्रहालयासारख्या वर्षानुवर्षे लटकवलेल्या अनेक योजना वर्तमान सरकारच्या काळात पूर्ण झाल्या. खासदारांसाठीच्या या सदनिकांमुळे नव्या लोकसभेच्या निवडीनंतर निवासस्थानांची जी कमतरता भासत असे, खासदारांना अनेक महिने हॉटेलांत राहावे लागते, त्यासारख्या समस्या संपुष्टात येणार आहेत.

कोरोना काळातही वेळेत पूर्ण झालेल्या नव्या इमारती पर्यावरणपूरक आहेत. बिर्ला कामकाज चालवताना वेळेची बचत करतात व या इमारतींचे काम करताना त्यांनी अंदाजित रकमेच्या १४ टक्के निधीचीही बचत केली.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com