esakal | काय सांगता! बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचं वय पाच वर्षांत वाढलं १२ वर्षांनी
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar_Tarkishore_Prasad

२०१०मध्ये त्यांनी त्यांचे वय ४९ वर्षे असल्याचे सांगितले होते. २०१५मधील निवडणुकीत ते ५२ वर्षांचे झाले.

काय सांगता! बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचं वय पाच वर्षांत वाढलं १२ वर्षांनी

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा (बिहार) : राजकीय नेत्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे अनेकदा पाहायला मिळते, पण बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांचे वय पाच वर्षांत दुपटीपेक्षा जास्त वाढले असल्याचे आढळल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Breaking: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई काळाच्या पडद्याआड​

बिहार विधानसभा निवडणुकीत कटिहार मतदारसंघातून विजयी झालेले भाजप नेते आणि आताचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे वय पाच वर्षांत १२ वर्षांनी वाढले आहे. प्रसाद यांनी वेगवेगळ्या निवडणुकांसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांत वयाबाबत वेगवेगळी माहिती दिली आहे.

२०१०मध्ये त्यांनी त्यांचे वय ४९ वर्षे असल्याचे सांगितले होते. २०१५मधील निवडणुकीत ते ५२ वर्षांचे झाले. म्हणजे पाच वर्षांत त्यांचे वय तीन वर्षांनी वाढले. २०२०मधील विधानसभा निवडणुकीत त्यांचे वय ६४ वर्षे असल्याचे नमूद केले आहे. यानुसार २०१५ आणि २०२० दरम्यान प्रसाद यांचे वय १२ वर्षांनी वाढले, तर २००५ आणि २०१० दरम्यान त्यांचे वय केवळ एका वर्षांनी वाढले.

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारले ४ प्रश्न; कोणते ते वाचा सविस्तर​

‘चुकीच्या जन्मतारखेत खोटेपणा नाही’
वयाच्या या तफावतीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी या गोष्टीला विनाकारण महत्त्व दिले असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, माझा जन्म ५ जानेवारी १९५६ रोजी झाला. प्रतिज्ञापत्रात जन्मतारीख असते. नजरचुकीने मी त्यावर चुकीची जन्मतारीख लिहिलेली असू शकते. मात्र, यात कोणताही खोटेपणा केलेला नाही.

 - देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image