गुजरातमध्ये ट्रक उलटून 19 मजुरांचा मृत्यू 

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

ट्रक उलटून झालेल्या अपघातात 19 मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बारा महिला; तर तीन मुलांचा सहावेश आहे. अन्य सहा जण जखमी झाले. 
 

अहमदाबाद - ट्रक उलटून झालेल्या अपघातात 19 मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बारा महिला; तर तीन मुलांचा सहावेश आहे. अन्य सहा जण जखमी झाले. 

हा अपघात अहमदाबाद-भावनगर महामार्गावर भवलीयारी गावाजवळ शनिवारी सकाळी घडला. सिमेंटच्या गोण्या भरलेला ट्रक भावनगर जिल्ह्यातील पिपावाव बंदराकडून येत होता. या ट्रकमधून 25 मजूर प्रवास करीत होते. भवलीयारी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. या अपघातात 18 मजूर जागीच ठार झाले. एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला.

Web Title: 19 laborers die in trucks accident