सामूहिक बलात्कारावेळी ओरडल्याने वाचला मुलीचा जीव

file photo
file photo

जलपैगुरी (पश्चिम बंगाल): एका एकोणीस वर्षीय मुलीवर दोघेजण सामूहिक बलात्कार करत होते. यावेळी ती जोराने ओरडत असल्याने तो आवाज ऐकून स्थानिक रहिवासी घटनास्थळी गेल्याने तीचा जीव वाचू शकला, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जणांनी एका मुलीला बळजबरीने उचलून नेले. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खाली दोघे जण सामूहिक बलात्कार करत होते. बलात्कार होत असताना तिघे तिथेच उभे होते. बलात्कार होत असताना मुलगी जोरजोरात ओरडत होती. एका स्थानिक रहिवाशाने तो आवाज ऐकला आणि घटनास्थळाकडे गेला. यावेळी मुलगी जीवाच्या अकांताने ओरडत असल्याचे पाहिले. धावत-पळत तो मुलीच्या घरी गेला अन् कुटुंबाला माहिती दिली. पीडित मुलीच्या कुटुंबासह अन्य नागरिक घटनास्थळी आल्यानंतर मुलीची सुटका झाली. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य तिघांचा शोध सुरू आहे. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जलपैगुरी जिल्ह्यातील जाहुरी तालमा या गावामध्ये मंगळवारी (ता. 25) सायंकाळी ही घटना घडली. स्थानिक नागरिक घटनास्थळी गेला नसता तर पीडित मुलीचा जीव गेला असता, असे स्थानिकांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com