पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर अखनूर सेक्टरमधील बीएसएफच्या चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले आहेत. अखनूर सेक्टरमधील प्रगवाल भागात पाककडून गोळीबार करण्यात आला.

श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याकडून आंतरराष्ट्रीय रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत करण्यात आलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान हुतात्मा झाले आहेत.

बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर अखनूर सेक्टरमधील बीएसएफच्या चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले आहेत. अखनूर सेक्टरमधील प्रगवाल भागात पाककडून गोळीबार करण्यात आला. बीएसएफकडूनही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. उपनिरीक्षक दर्जाचे हे दोन्ही जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. कुमार पांडे आणि सत्यनारायण यादव अशी या जवानांची नावे आहेत.

पाकिस्तानकडून बीएसएफकडे गोळीबार न करण्याची विनंती केल्यानंतर पाककडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे. रमजान महिन्यात भारत सरकारने सीमेवर गोळीबार न करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही पाकिस्तानकडून आगळीक सुरुच आहे. पाककडून यापूर्वीही सीमेवरील गावांवर गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 2 Soldiers Killed In Firing By Pakistan In Jammus Akhnoor