नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नौशेरात दोन जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
बुधवार, 1 जानेवारी 2020

जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांचे शोधकार्य सुरू असताना झालेल्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले आहेत. शोधकार्याच्या दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. 

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांचे शोधकार्य सुरू असताना झालेल्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले आहेत. शोधकार्याच्या दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. 

राजकारणापासून आम्ही नेहमी दूर असतो : बिपीन रावत

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या चकमकीनंतरही जवानांनी शोधकार्य सुरूच ठेवले. जवानांना नौशेरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे जवानांनी त्या भागात शोधकार्य सुरू केले होते. याचवेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार झाला व ते हुतात्मा झाले. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख उत्तर दिले आहे.

5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात लँडलाइन, इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 soldiers martyard at Naushera sector Jammu Kashmir