प्लेस्कूलमध्ये दोन वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जुलै 2018

प्लेस्कूलच्या परिसरात दोन वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना कोलकात्यातील डायमंड हार्बर परिसरात घडली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पीडित बालकाच्या वडिलांनी ठाकूरपुरकर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

कोलकाता : प्लेस्कूलच्या परिसरात दोन वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना कोलकात्यातील डायमंड हार्बर परिसरात घडली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पीडित बालकाच्या वडिलांनी ठाकूरपुरकर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

डायमंड हार्बर परिसरात एक प्लेस्कूल असून, या प्लेस्कूलमध्येच या दोन वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याबाबत पीडित बालकाच्या वडिलांनी सांगितले, की ''2 जूनला मुलगा घरी आला त्यावेळी त्याच्या गुप्तांगामधून रक्तस्त्राव होत होता. आम्ही मुख्याध्यापक आणि प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज द्यावे यासाठी विनंती केली. मात्र, जूनपासून सीसीटीव्ही बंद पडल्याचे कारण देत सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला. शाळा प्रशासनाने जाणुनबुजून फुटेज डिलिट केले, असा आम्हाला संशय आहे''. याबाबतचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून, या अहवालात त्या बालकावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, याबाबत पीडित बालकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात 'पॉस्को'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: 2 Year Old Playschool Child Sexual Assault Kolkata Case Registered Under Posco