भारत-बांगलादेश सीमेवर दोन्ही देशांना जोडणारे २०० मीटर लांबीचे भुयार आढळले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

भारत - बांगलादेश सीमेवर कुंपणाखाली भुयार आढळल्याने खळबळ उडाली आहे. आसाममधील करीमगंज जिल्ह्यात पोलिसांना हे दोन्ही देशांना जोडणारे २०० मीटर लांबीचे भुयार आढळले. करीमगंजमधील दोन अपहत रहिवाशांचा शोध घेताना पोलिसांना अपघातानेच या भुयाराचा शोध लागला.

करीमगंज (आसाम) - भारत - बांगलादेश सीमेवर कुंपणाखाली भुयार आढळल्याने खळबळ उडाली आहे. आसाममधील करीमगंज जिल्ह्यात पोलिसांना हे दोन्ही देशांना जोडणारे २०० मीटर लांबीचे भुयार आढळले. करीमगंजमधील दोन अपहत रहिवाशांचा शोध घेताना पोलिसांना अपघातानेच या भुयाराचा शोध लागला.

ब्रेकफास्ट अपडेट्स: मुंबई सेंट्रल नव्हे तर नाना शंकरशेठ टर्मिनस ! यासह महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

सीमा सुरक्षा दलाने हे भुयार म्हणजे पाण्याचा निचरा करण्यासाठीचा काँक्रिटचा पाईप असल्याचा दावा केला. हा पाईप ३० ते ४० फुट लांब व ३ फूट व्यासाचा आहे. भारतातून बांगलादेशमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा रस्ता व कुंपणाच्या बांधकामापूर्वी तो टाकण्यात आला, असे दलाच्या निवेदनात म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यापूर्वीही सापडले होते भुयार
आसाममधील करीमनगर जिल्ह्याची सुमारे ९२ किलोमीटरची सीमा बांगलादेशला लागून आहे. या सीमेवर २२ ठिकाणी कुंपण नाही. यापूर्वी २०१८ मध्येही गायीच्या तस्करीचा शोध घेतानाच अशा प्रकारचा बोगदा आढळला होता.

काय आहे प्रकरण?
करीमगंजमध्ये नीलम बाजार पोलिसांकडे दोघांचे अपहरण करून त्यांना बांगलादेशला नेण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी यासंदर्भात तिघांना अटक केली. या तिघांचा गायीच्या तस्करीशी संबंध होता. करीमगंजमधील अपहत दोघांनी सीमेपलीकडून गायीची तस्करी करण्यासाठी बांगलादेशी नागरिकांकडून पैसे घेतले होत. मात्र, गायींच्या तस्करीत अपयश आल्याने त्यांना बांगलादेशातच ताब्यात ठेवण्यात आले. त्यांनी तस्करीसाठी बांगलादेशात प्रवेश केल्याची किंवा त्यांचे अपहरण झाल्याची शक्यता करीमगंजचे पोलीस अधीक्षक मयांक कुमार यांनी वर्तविली. या प्रकरणाचा शोध घेताना संबंधित भुयार सापडले, असेही त्यांनी सांगितले. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 meter long tunnel connecting two countries found India Bangladesh border