ब्रेकफास्ट अपडेट्स: मुंबई सेंट्रल नव्हे तर नाना शंकरशेठ टर्मिनस ! यासह महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

सकाळच्या महत्वाच्या घडामोडी येथे वाचा

1) मुंबईकरांनो महत्त्वाची बातमी, आता मुंबई सेंट्रल टर्मिनसवर जाऊ नका; आता जावं लागणार 'नाना शंकरशेठ टर्मिनस'वर
मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाव लवकरच नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेना उपनेते आणि खासदार अरविंद सावंत यांना पत्राद्वारे दिली आहे. - सविस्तर बातमी

2) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचा जीव धोक्यात, कोण उठलंय मुंबई महापौरांच्या जीवावर ?
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा जीव धोक्यात आहे. कारण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. समोर येणाऱ्या माहितीनुसार गेल्या महिन्यात २१ तारखेला म्हणजेच २१ डिसेंबर रोजी धमकीचा फोन आला होता. - सविस्तर बातमी

3) नाशिकमध्ये होणार राजकीय उलथापालथ! वसंत गिते, सुनील बागूल शिवसेनेत? संजय राऊतांचा नाशिक दौरा चर्चेत
शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत गुरुवारी (ता. ७) व शुक्रवारी (ता. ८) नाशिक दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते भाजपच्या दोन प्रदेश उपाध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. - सविस्तर बातमी

4) तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल कोरोनाची लस; जाणून घ्या लशीकरणाची संपूर्ण प्रक्रिया
ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूच्या दहशतीदरम्यान भारत कोरोना लशीकरणाच्या प्रक्रियेसाठी आता सज्ज झाला आहे. देशात सर्वात आधी 30 कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे. - सविस्तर बातमी

5) 'ठाकूर' लिहिलेल्या बुटांची विक्री; UP पोलिसांनी मुस्लिम विक्रेत्याला घेतलं ताब्यात
उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरातील एका मुस्लिम दुकानदाराविरोधात दाखल केलेल्या FIR नंतर ताब्यात घेतलं गेलं आहे. एका वेगळ्याच कारणासाठी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. - सविस्तर बातमी

6) आतली खबर : राजकारण्यांना ED ची चौकशी म्हटली की धडकी का भरते ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अटकेनंतर सक्तवसुली संचालनालयासारखी (ED ) संस्था पण असते, हे सर्वप्रथम महाराष्ट्रातील तळागाळातील नागरीकांना माहिती पडले. - सविस्तर बातमी

7) ब्रिटनमध्ये आढळले आजवरचे सर्वाधिक कोरोनाबाधित; नव्या स्ट्रेनचा कहर
गेल्या एका वर्षापासून जगभरात कोरोना नावाच्या विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोना नावाचा व्हायरस पसरल्यापासून आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संक्रमणाची नोंद झाली आहे. - सविस्तर बातमी

8) पोलिस भरतीचा निर्णय ! 'एसईबीसी'तील विद्यार्थ्यांना भरावे लागणार खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क; 'ईडब्ल्यूएस'चा उल्लेखच नाही
पोलिस भरतीसंदर्भात 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करुन संबंधित विद्यार्थ्यांची पात्रता, वयोमर्यादा पाहून त्यांच्याकडून वाढीव परीक्षा शुल्क 15 दिवसांत भरुन घेतले जाणार आहे. - सविस्तर बातमी

9) पुणेकरांनो, छत्री, रेनकोट जवळ ठेवा, दोन दिवस पावसाचा अंदाज 
पुणे- शहरात बुधवारी (ता. 6) दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्‍यता आहे. तसेच, गुरुवार (ता. 7) आणि शुक्रवारी (ता. 8) हलक्‍या स्वरूपाचा पाऊस शहर आणि परिसरात हजेरी लावले, असा अंदाज वेधशाळेने मंगळवारी वर्तविला. - सविस्तर बातमी

10) Gold Price : सोने-चांदीच्या भावात उसळी; वाचा किती झाला सोन्याचा भाव
रुपयाच्या तुलनेत डॉलरमध्ये घसरण झाल्याने सोने आणि चांदीच्या भावामध्ये अचानक वाढ झाली. सोने एक हजार रुपये दहा ग्रॅम तर चांदी प्रती किलो दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. - सविस्तर बातमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breakfast news mumbai central nana shankarsheth terminus kishori pednekar nashik sanjay raut ed corona Britain pune weather gold rate