esakal | संसदेजवळ 200 शेतकऱ्यांसह होणार आंदोलन; टिकैत यांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

rakesh tikait

22 जुलैपासून 200 शेतकरी संसदेजवळ आंदोलन करतील, अशी माहिती भारतीय किसान मोर्चाचे प्रमुख राकेश टिकैत यांनी दिली आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 200 लोक संसदेच्या आवारात आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे

संसदेजवळ 200 शेतकऱ्यांसह होणार आंदोलन; टिकैत यांचा इशारा

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- 22 जुलैपासून 200 शेतकरी संसदेजवळ आंदोलन करतील, अशी माहिती भारतीय किसान मोर्चाचे प्रमुख राकेश टिकैत यांनी दिली आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 200 लोक संसदेच्या आवारात आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने तीन नवीन कृषी कायदे लागू केले आहेत. यापार्श्वभूमीवर जवळपास गेल्या 8 महिन्यांपासून देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहेत. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. (200 people will hold protests near Parliament from July 22 BKU rakesh Tikait)

राकेश टिकैत एएनआयला बोलताना म्हणाले की, कृषी कायद्यांवर केंद्र सरकारला चर्चा करायची असेल, तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. पण चर्चा झाली नाही किंवा योग्य ते निकाल निघाले नाहीत तर 22 जुलैपासून 200 लोक संसदेजवळ आंदोलन करतील. टिकैत मंगळवारी म्हणाले की, शेतकरी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यास तयार आहे. पण, चर्चा कोणत्याही अटीशर्तींशिवाय व्हायला हवी.

हेही वाचा: लस 'मिक्स' करणे धोकादायक ट्रेंड; WHO चा इशारा

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले होते की, केंद्र सरकार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी तयार आहे. यानंतर राकेश टिकैत यांनी चर्चची तयारी दाखवली आहे. प्रजासत्ताक दिनादिवशी झालेल्या घटनेबाबत बोलताना टिकैत म्हणाले की, कृषी कायद्याचा मुद्दा आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे घेऊन जाऊ , असं म्हटलेल नाही. 26 जानेवारीला झालेल्या घटनांबाबत आम्ही याआधी उत्तर दिलं आहे.

हेही वाचा: पृथ्वीवर आदळणार सोलार वादळ; मोबाईल सिग्नल, GPS होणार प्रभावित

प्रजासत्ताक दिनादिवशी आंदोलनकर्त्यांनी निर्धारित मार्गाचा वापर केला नाही. त्यांनी बॅरिकेट तोडले आणि दिल्लीमध्ये घुसले. पोलिसांसोबत आंदोलनकर्त्यांचा संघर्ष झाला. राजधानीतील अनेक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि धार्मिक झेंडा लाल किल्ल्यावर फडकावण्यात आला. दरम्यान, 26 नोव्हेंबर पासून शेतकरी देशातील विविध भागात आंदोलन करत आहेत. त्यांनी केंद्राने आणलेल्या तीन कायद्यांना विरोध केला आहे. हे काळे कायदे रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पण, केंद्र सरकारकडून त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

loading image