esakal | लस 'मिक्स' करणे धोकादायक ट्रेंड; WHO चा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

soumya swaminathan

वेगवेगळ्या कंपन्यांच्या लशी अशा प्रकारे मिक्स करण्याचा ट्रेंड धोकादायक असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organisation (WHO)) प्रमुख वैज्ञानिक सोमया स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी व्यक्त केलं आहे.

लस 'मिक्स' करणे धोकादायक ट्रेंड; WHO चा इशारा

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

जिनिव्हा- कोरोना विषाणूवर उपचार म्हणून लस 'मिक्स अँड मॅच' करण्याची पद्धत काही ठिकाणी वापरली जात आहे. पण, वेगवेगळ्या कंपन्यांच्या लशी अशा प्रकारे मिक्स करण्याचा ट्रेंड धोकादायक असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organisation (WHO)) प्रमुख वैज्ञानिक सोमया स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी व्यक्त केलं आहे. अशा प्रकारच्या उपचार पद्धतीबाबत कमी प्रमाणात डेटा उपलब्ध असल्याचं त्या म्हणाल्या. कोरोनासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. (dangerous trend of mixing COVID 19 vaccines said WHO chief scientist Soumya Swaminathan)

सगळ्यांनी खबरदारी घ्यायला हवी. अनेक देशांमध्ये लशींना 'मिक्स अँड मॅच' करुन वापरण्यात येत आहे. पण, अशा उपचार पद्धतीबाबत पुरेसा डेटा उपलब्ध नाही. यासंदर्भात अभ्यास सुरु आहे. त्यामुळे आपल्याला याबाबत आणखी वाट पाहावी लागणार आहे. अनेक देशात कोरोना प्रतिबंधक लशीचा पुरेसा साठा आहे. तरीही अशाप्रकारची उपचार पद्धत वापरली जात असेल तर आपल्याला विचार करण्याची गरज आहे. कारण, हे धोकादायक ठरु शकतं, असं सोमया स्वामीनाथन म्हणाल्या आहेत.

हेही वाचा: 'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

सोमया स्वामीनाथन यांना बुस्टर डोसबाबत प्रश्व विचारण्यात आला. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, लोकांना लशीचा दुसरा, तिसरा किंवा चौथा डोस केव्हा घ्यायचा हे नागरिक ठरवू लागल्यास गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. आतापर्यंत चार देशांनी बुस्टर डोसचा कार्यक्रम राबवला आहे. इतर काही देश असं करण्याचा विचार करत आहेत. पण, अशा कार्यक्रमांमुळे आपल्याला अधिकचे 80 कोटी डोस लागू शकतील. सध्या असे काही देश आहेत, जेथे आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोना प्रतिबंधक लस मिळाली नाही.

हेही वाचा: कोरोना हॉस्पिटलला भीषण आग; 52 लोकांचा मृत्यू

दरम्यान, जगावरील कोरोना महामारीचे संकट अजून टळलेले नाही. Johns Hopkins University च्या माहितीनुसार आतापर्यंत 18.6 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 40 लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीचे संकट आणखी काही वर्ष आपल्यासोबत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लोकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडून केले जात आहे.

loading image