भाजप पुन्हा सत्तेत येईल याबाबत शंका- सरसंघचालक

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 जानेवारी 2019

नवी दिल्ली- पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव या पार्श्वभूमीवर भाजप पुन्हा सत्तेत येईल याबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांनी शंका व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये सेवाधान शाळेतील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

भागवत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवरुन अनिश्चितता व्यक्त केली. शैक्षणिक धोरणांवर ते म्हणाले, शैक्षणिक धोरणांमध्ये बदल करायला हवेत, शिक्षणासंदर्भात एक नवे धोरणा आखण्यात आले आहे. मात्र, याच्या अंमलबजावणीला आता जास्त काळ राहिलेला नाही. भविष्यात भाजप सत्तेत असेल की नाही यावर याची अंमलबजावणी ठरेल असेही ते म्हणाले.

भैयाजींची भूमिका योग्य 
सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना राममंदिरावर संघ ठाम असल्याचे म्हटले होते, तर सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी ट्‌विट करून "भाजपने 2014 च्या जाहीरनाम्यात राममंदिराचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना अयोध्येत राम मंदिर बांधावे लागेल,' अशी भूमिका मांडली होती. त्याविषयी बोलताना "होसबळे हे सहसरकार्यवाह आहेत, भैयाजी जोशी हे सरकार्यवाह आहेत आणि मी सरसंघचालक आहे. भैयाजींनी मांडलेली भूमिका योग्य असून, तीच माझीही भूमिका आहे', असेही डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.

Web Title: 2019 Lok Sabha Poll Mohan Bhagwat Referred Uncertainty About Results