Rajya Sabha Elections 2026
esakal
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवानंतर आता काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. कारण या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम आता 2026 मध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या 72 जागांसाठी एप्रिल, जून आणि नोव्हेंबर 2026 मध्ये निवडणूक होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी झालेल्या राज्य विधासभांच्या निवडणुकीतही काँग्रेसचं प्रदर्शन निराशाजनक राहिलं आहे. त्यात आता बिहारमधील पराभवानंतर त्यांच्या चिंतेत आणखी वाढ झालीआहे.