100 वर्षांच्या वृद्ध महिलेवर तरुणाचा बलात्कार

वृत्तसंस्था
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

''या बलात्कारप्रकरणी संबंधित आरोपीला काल (मंगळवार) अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे''.

- वरिष्ठ पोलिस अधिकारी, चकदाहा पोलिस ठाणे

नवी दिल्ली : शंभर वर्षांच्या वृद्ध महिलेवर एका 21 वर्षीय तरूणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात घडली. पीडित महिला घरात एकटी झोपली असताना तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने हे कृत्य केले, अशी माहिती आज (बुधवार) पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली. 

अभिजीत विश्वास असे संबंधित आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर कल्याणी येथील उप-विभागीय न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही घटना कोलकातापासून 65 किमी अंतरावरील गंगा प्रसादपूर गावात घडली. याबाबतची तक्रार चकदाहा पोलिस ठाण्यात पीडित वृद्धेच्या मुलाने दिली.

''या बलात्कारप्रकरणी संबंधित आरोपीला काल (मंगळवार) अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे'', अशी माहिती चकदाहा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.  

दरम्यान, जुलै महिन्यामध्ये कोलकातापासून 198 किमी दूर असलेल्या पूर्व मीडनापोर जिल्ह्यात एका 70 वर्षीय वृद्धेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर आता ही घटना समोर आली आहे.  

Web Title: 21 year old man arrested in Bengal for raping 100 year old neighbour