जयपूरचा मयंक झाला 21व्या वर्षी न्यायाधीश!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

न्यायाधीश पदाच्या परीक्षेसाठी 23 वर्षे वयोमर्यादा आवश्‍यक आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने या वर्षी वयाची अट कमी करून 21 वर्षे केली आहे. या निर्णयाचे मयंकने स्वागत केले आहे. यामुळे न्यायाधीशांची रिक्त पदे भरण्यास मदत होईल.

जयपूर : राजस्थानचा मयंक प्रतापसिंह हा विधी शाखेचा विद्यार्थी भारतातील सर्वांत तरुण न्यायाधीश ठरणार आहे. जयपूरचा रहिवासी असलेला मयंक 2018मधील न्यायाधीश सेवा परीक्षा उत्तीर्ण झाला असून भारतातील सर्वांत कमी वयात न्यायाधीश बनण्याचा मान त्याला मिळणार आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या यशाबद्दल मयंक म्हणाला की, मला कायमच न्यायालयीन सेवा तसेच न्यायाधीशांचे महत्त्व आणि समाजात मिळणारा त्यांना मिळणारा सन्मान याबद्दल आकर्षण वाटत आले आहे. मी 2014 मध्ये राजस्थान विद्यापीठातून एलएलबी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. या वर्षी मला पदवी मिळाली आहे. न्यायाधीश सेवा परीक्षा मी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालो, याचा आनंद मला आहे. यासाठी मला प्रोत्साहन देणारे माझे कुटुंब, शिक्षण व हितचिंतक यांचे आभार मी मानतो. 

पहिलवान ते महापौर; पुण्याच्या मुरलीधर मोहोळांचा राजकीय प्रवास

न्यायाधीश पदाच्या परीक्षेसाठी 23 वर्षे वयोमर्यादा आवश्‍यक आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने या वर्षी वयाची अट कमी करून 21 वर्षे केली आहे. या निर्णयाचे मयंकने स्वागत केले आहे. यामुळे न्यायाधीशांची रिक्त पदे भरण्यास मदत होईल. मला माझ्या करिअरमध्ये जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल, असा विश्‍वास त्याने व्यक्त केला. 

Video: देवीसमोर कान पकडले, उठा-बशा काढल्या अन्...

न्यायाधीश पदाच्या परीक्षेसाठी वयोमर्यादा कमी केल्यानेच मी परीक्षा देऊ शकलो. याचा मला फायदाच होणार आहे. कारण आता मला शिकण्यासाठी जास्त वेळ मिळेल. मी अगदी तरुण वयात न्यायाधीश झाल्याने जास्त काम आणि लोकांची सेवा करू शकेन. 
- मयंक प्रतापसिंह


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21 years old Mayank Pratapsingh becomes judge from Jaipur