युवकांच्या मृत्यूप्रकरणी 24 जण अटकेत 

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

आसाममध्ये कार्बी अँगलॉंग जिल्ह्यात बेदम मारहाणीत दोन युवकांचा झालेल्या मृत्यूप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या 24 वर पोचली आहे.

गुवाहाटी: आसाममध्ये कार्बी अँगलॉंग जिल्ह्यात बेदम मारहाणीत दोन युवकांचा झालेल्या मृत्यूप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या 24 वर पोचली आहे.

याव्यतिरिक्त डिपहू येथे सोशल मीडियावरून अफवा पसवरणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. युवकांच्या मारहाणीचे मोबाईलवर चित्रीकरण करून ते व्हायरल करण्यात हे पाच जण सहभागी होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर यासंबंधी कोणत्याही प्रकारची अफवा आणि व्हिडिओ प्रसारित न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निलोत्पल दास आणि अभिजित नाथ या दोन युवकांची शुक्रवारी जमावाने मुले चोरत असल्याचा आरोपावरून बेदम मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

Web Title: 24 people are accused in the death of youth