esakal | ऑगस्टमध्ये २४.३ लाख टन पेट्रोलची विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

petrol

ऑगस्टमध्ये २४.३ लाख टन पेट्रोलची विक्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : इंधनाचे दर आकाशाला भिडलेले असताना पेट्रोलची विक्री वाढलेली दिसत आहे, तर डिझेलच्या मागणीत घट झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी (ता. १) जाहीर आकडेवारी जाहीर केली आहे. या कंपन्यांनी ऑगस्टमध्ये २४.३ लाख टन पेट्रोलची विक्री केली.

१३.६ टक्क्यांनी वाढ

कोरोनाचे निर्बंध देशभर शिथिल झाल्याने पूर्वीप्रमाणेच मागणी वाढली असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये पेट्रोल विक्री २३.३ लाख टन होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यात १३.६ टक्क्यांनी वाढ नोंदविली आहे. कोरोना पूर्वीची पातळीही पेट्रोल विक्रीने गाठली आहे.

हेही वाचा: परीक्षार्थींनो Best Luck; पोलिस बंदोबस्तात उद्या भरतीची लेखी परीक्षा

निर्बंधामुळे डिझेलच्या विक्रीत घट

देशभरात सर्वांत जास्त वापर असलेले इंधन म्हणजेच डिझेलची मागणी घटली आहे. गेल्या वर्षी व आताच्या ऑगस्ट महिन्याची तुलना करता ही विक्री १५.९ टक्क्यांनी वाढून ४९.४ लाख टन झाली आहे. मात्र ऑगस्ट २०१९ त्या तुलनेत ही विक्री ९.८ टक्क्याने कमी आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्येही डिझेलच्या विक्रीत ९.३ टक्के एवढी घट नोंदविली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन होता व पावसाळ्याच्या काळात वाहतूक कमी असल्याने डिझेलला मागणी कमी असल्याचे सांगण्यात आले. यंदा ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यात डिझेलच्या विक्री कोरोनापूर्व काळापेक्षाही आठ टक्क्याने खाली आली होती.

ऑगस्ट २०२१ घरगुती गॅस सिलिंडरची मागणी-२३.२ लाख टन

वर्षभरातील वाढ-१.८३ टक्के

ऑगस्ट २०१९च्या तुलनेत मागणी कमी-२.४ टक्के

विमानांसाठी जेट इंधनाची मागणी

३,५०,००० टन-ऑगस्ट २०२१

४१.७ टक्के-ऑगस्ट २०२०पेक्षा वाढ

४४.५ टक्के-ऑगस्ट २०१९पेक्षा कमी

loading image
go to top