26/11 Terrorist–Pak Handler Calls
esakal
Dhurarndar 26/11 Facts : मुंबईतील २६/११ हल्ल्याला नुकतीच १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. १७ वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. यावेळी सीएसटी रेल्वे स्टेशनवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. तसेच ताज हॉटेल आणि नरिमन हाऊससारख्या ठिकाणी अनेक नागरिकांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, ज्यावेळी हा हल्ला सुरू होता, त्यावेळी हे दहशतवादी थेट पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या आकांशी बोलत होते आणि तिथून त्यांना निर्देश दिले जात होते.