
सेंट्रल ट्रेड युनियनच्या वतीने 29 नोव्हेंबर रोजी लेबर कायद्याच्या विरोधात संप पुकारण्यात आला आहे.
नवी दिल्ली: जर तुमचे या आठवड्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर ते बुधवारीच पूर्ण करून घ्या कारण यानंतर तीन दिवसांची सुट्टी आहे. ज्यामध्ये गुरुवारच्या एका दिवसाच्या संपाचादेखील समावेश असून त्या दिवशी बँका बंद राहणार आहेत. यापूर्वीच ऑल इंडिया बैंक एंप्लॉयी असोसिएशन (AIBEA) 26 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी देशव्यापी संपात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी बँका उघडतील पण नंतर चौथ्या शनिवारमुळे 28 तारखेला आणि 29 ला रविवार असल्याने बँका बंद राहतील.
26 नोव्हेंबरला देशव्यापी संप-
सेंट्रल ट्रेड युनियनच्या वतीने 29 नोव्हेंबर रोजी लेबर कायद्याच्या विरोधात संप पुकारण्यात आला आहे. या संपात 10 केंद्रीय कामगार संघटना सहभागी होणार आहेत. मात्र, भारतीय मजदूर संघाने त्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारला मिळतो कर, पण सामान्यांच्या मागे लागते घरघर
तीन कामगार कायद्यांना मंजुरी-
पावसाळी अधिवेशनात लोकसभेने तीन कामगार कायदे मंजूर केले होते. ईज ऑफ डूइंग बिजनसच्या नावाखाली सरकारने 27 कायदे फेटाळून लावले होते, हे कायदे नाकारून सरकार देशातील बड्या उद्योगपतींचा फायदा करून देत आहे, असा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.
देशातील Top-10 हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे व्याजदर खिशाला परवडणारे
75 टक्के कामगार कायद्याच्या बाहेर-
AIBEAच्या मत आहे की, नव्या कायद्यानुसार 75 टक्के कामगारांना कामगार कायद्यातून वगळण्यात आले आहे. यामुळे त्यांना कोणतेही कायदेशीर संरक्षण मिळणार नाही. देशातील बऱ्याच बँका AIBEA अंतर्गत येतात. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांचा समावेश नाही. AIBEA 4 लाख बँक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करते.
(edited by- pramod sarawale)