२५ रुपयांच्या पेट्रोलसाठी तुम्ही मोजताय ८७ रुपये; याचा कधी विचार केलाय?

प्रमोद सरवळे
Wednesday, 25 November 2020

पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलत असतात. दररोजचे नवीन दर सकाळी 6 वाजता जाहीर होत असतात.

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलत असतात. दररोजचे नवीन दर सकाळी 6 वाजता जाहीर होत असतात. आपण बऱ्याचदा ऐकतो की, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाचे किंमती वाढल्या किंवा घसरल्या. त्याचा परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होत असतो. नेमकं काय कारण आहे ज्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात चढउतार होत असतो? ग्राहकांपर्यंत येईपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर 3-4 पटीने कसे वाढतात? हे आज आपण पाहणार आहोत. 

पेट्रोल-डिझेल तुमच्यापर्यंत कसे पोहोचते-
1. भारत पेट्रोलियम पदार्थांमध्ये पेट्रोलच्या गरजेच्या 85 टक्क्यांहून अधिक आयात करते.
 
2. परदेशातून येणारे कच्चे तेल  रिफायनरीत जात असते, जिथून पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादने काढली जात असतात.

3. नंतर पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादने तेल कंपन्यांकडे जात असतात. यामध्ये इंडियन ऑयल, हिंदुस्तान पेट्रोलियमसारख्या कंपन्यांचा समावेश असतो. त्यानंतर ते तेल पेट्रोल पंपावर पाठवले जाते.

देशातील Top-10 हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे व्याजदर खिशाला परवडणारे

4. पेट्रोल पंपमालक पेट्रोल पंपावर आल्यानंतर आपले कमिशन जोडतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या कर धरून पेट्रोल पंपावर तेल लोकांना विकलं जातं.

सरकारला 25 रुपयांत मिळणारं पेट्रोल ग्राहकांना 80 रुपयांपेक्षा जास्त दरात पेट्रोल विकलं जातं?

सरकार परदेशातून कच्चे तेल विकत घेत असते. हे कच्चे तेल सरकारकडून बॅरलमध्ये विकत घेतले जाते. एक बॅरल म्हणजे सुमारे 159 लिटर तेल असते. या वर्षी 16 नोव्हेंबरला दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 81.06 रुपये होती. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मते 1 लिटर पेट्रोलची आधारभूत किंमत 25.37 रुपये होती. त्यानंतर त्यात 32.98 रुपये एक्साइज ड्यूटी , 18.71 रुपये व्हॅट, त्यानंतर 3.64 रुपये पेट्रोल पंपाच्या मालकाचे कमिशन होते. 

1 लिटर डिझेल 25 रुपयांचे असते-
पेट्रोलप्रमाणेच डिझेलची आधारभूत किंमतही 25 रुपये आहे. 16 नोव्हेंबररोजी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची आधारभूत किंमत 24.42 रुपये होती. त्याचे 0.33 रुपयांचे भाडे  होते. त्यानंतर 31.83 रुपये एक्साइज ड्यूटी, 10.36 रुपये व्हॅट आणि 2.52 पेट्रोल पंप मालकाचे कमिशन देण्यात आले. त्यानंतर 1 लिटर डिझेलची किंमत 70 रुपये 46 पैशांवर गेली आहे.

LPG सिलेंडरची सबसिडी जमा झाली ? माहिती करून घ्या

केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर उत्पादन शुल्क आकारते. या वर्षी मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली होती. सध्या एक लिटर पेट्रोलवर उत्पादन शुल्क 32.98 रुपये आणि डिझेलवर 31.83 रुपये आहे.

2014 मध्ये मोदी सरकार आले तेव्हा 1 लिटर पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 9.48 रुपये आणि डिझेलवर 3.56 रुपये होते. त्यामुळेच कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या तरीही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होत नाहीत. मे 2014 मध्ये मोदी सरकार आल्यापासून उत्पादन शुल्कात 16 वेळा बदल करण्यात आला आहे. यामध्ये फक्त 3 वेळेस हा कर कमी करण्यात आला होता. या वाढणाऱ्या किंमतींचा बोजा सामान्य जनतेवर पडत असतो. जरी यातून सरकारला चांगला पैसा मिळत असला तरी सामान्य लोक या किंमतवाढीमुळे बेजार झाले आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कातून सरकारला चांगले उत्पन्न मिळते. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेलने (PPAC) दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील उत्पादन शुल्क आणि विविध करांच्या माध्यमातून 49 हजार 914 कोटी रुपये कमावले आहेत.

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how petrol and diesel prices change in daily