सुसाइड नोट लिहित तरुणीनं घेतला गळफास; आरोपीवर 'लव्ह जिहाद'चा आरोप

वृत्तसंस्था
Sunday, 10 January 2021

घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने परिसरातील पोलिस ठाण्यात धाव घेत संपूर्ण घटना सांगितली आणि आरोपी युवकावर लव्ह जिहादचा आरोप केला.

भोपाळ : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपाळच्या टीटी नगर भागात राहणाऱ्या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी मुलीने सुसाइट नोटही लिहली आहे, ज्यात तिने आदिल नावाच्या मुलाला आपल्या मृत्युसाठी जबाबदार धरले आहे. पोलिसांनी सुसाइट नोट ताब्यात घेतली असून आरोपी युवकाला अटक केली आहे.

पुणे : 2 फरार आरोपी जेरबंद; बिनविरोध निवडून आल्यावर केला होता हाफ मर्डर​

मिळालेल्या माहितीनुसार, टीटी नगर भागात राहणाऱ्या युवतीने घरात गळफास घेत आत्महत्या केली. तिची एक सुसाइट नोट सापडली. ज्यात तिने लिहले आहे की, मी आत्महत्या करणार आहे याला आदिल खान जबाबदार आहे. आदिल खान सन ऑफ खालिक खान. यात आरोपीचा मोबाइल नंबर आणि घराचा पत्ताही लिहला आहे.

'भाजपनं पाठीत खंजीर खुपसला'; JDU नेत्यांनी नितीश कुमारांसमोर मांडल गाऱ्हाणं!​

घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने परिसरातील पोलिस ठाण्यात धाव घेत संपूर्ण घटना सांगितली आणि आरोपी युवकावर लव्ह जिहादचा आरोप केला. आदिल नावाच्या मुलाने आपल्या मुलीशी बबलू नावाने मैत्री केल्याचा आरोप मुलीच्या वडलांनी आणि भावाने केला आहे; परंतु मुलीला सत्य समजताच तिने आदिलपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने मुलीवर अत्याचार केला. त्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी संबंधित कलमांसह गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

- देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 years girl commits suicide in Bhopal family blames love jihad for death