
नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याच्या चौकशीला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सुरुवात केली आहे. मुंबई हल्ल्यातील त्याचा सहभाग नेमक्या कशा स्वरुपाचा होता, दहशतवादी संघटना लष्करे तैएबा सोबतचे त्याचे संबंध आणि हल्ल्यामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय होती काय, याचा शोध ‘एनआयए’ घेणार आहे. दहशतवादी डेव्हिड हेडली आणि राणा यांनी मुंबई, गुजरात, आग्रा आणि दिल्लीत रेकी केली होती. त्यामुळे तपासासाठी राणा याला संबंधित ठिकाणी नेले जाणार असल्याचे समजते.