नांदेडमध्ये हत्या ते दहशतवादी कारवाया; रिंदा प्रकरणाचा तपास ATSकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा

नांदेडमध्ये हत्या ते दहशतवादी कारवाया; रिंदा प्रकरणाचा तपास ATSकडे

नांदेड : नांदेडमध्ये 2016 साली खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याने एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याच्यावर दाखल झालेल्या हत्येच्या गुन्ह्याचा तपास आता दहशतवाद विरोधी पथक (ATS) करणार आहे. अवतार सिंग उर्फ ​​मनू असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव होतं.

पाकिस्तान आणि दहशतवाद्यांकडून भारतातील कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी हरियाणातील कर्नाल भागात चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून पाकिस्तानातून शस्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येत असल्याचं उघड झालं होत. त्याच पार्श्वभूमीवर हरविंदर सिंग रिंदा याने हत्या केलेल्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.

हेही वाचा: पाकिस्तान ते तेलंगाणा via पंजाब; दहशतवाद्यांच्या तस्करी कारवाया सुरूच

हरविंदर सिंग रिंदा याने २०१६ मध्ये अवतार सिंग उर्फ ​​मनू नावाच्या व्यक्तीची गोळी मारून हत्या केली होती. रिंदा याच्या भावाला मारण्यात मनू या व्यक्तीचा हात असल्याने, सूडेच्या भावनेतून रिंदा याने हा हल्ला केला असून त्यामध्ये मनूचा मृत्यू झाला होता. तर हरजिंदर सिंग चावला, किरणकोर अचल सिंग आणि बलविंदर सिंग हे जखमी झाले होते. याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात 2016 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सध्या हरविंदर सिंग हा पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे असून ISI च्या मदतीने भारतात दहशतवादी कारवाया घडवण्याचा कट रचत असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा संबंध काही दिवसांपूर्वी हरियाणामधील कर्नाल मध्ये अटक करण्यात आलेल्या चार संशयित दहशतवाद्यांशी असल्याच्या संशयावरून 2016 मधील झालेल्या खूनाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.

हेही वाचा: 'अच्छे दिन कुठे आहेत?'; महागाई दरावरून रुपाली ठोंबरेंचा निशाणा

दरम्यान कर्नालमधून अटक करण्यात आलेल्या दहशवाद्यांच्या चौकशीत पाकिस्तानातून शस्त्रे आणि अंमली पदार्थ भारतात येतात आणि येथील विविध भागांत ते पोहचवले जात असल्याचं समोर आलं होतं. तेलंगाणा, नांदेड, पंजाब आणि हरियाणामधील काही भागांत शस्त्रे पुरवल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी दिली होती.

Web Title: Khalistani Terrorist Harvindar Rinda Murder Case Moved On Ats

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :murderTerroristATS
go to top