
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : शाळांमध्ये सुरू होणार Youth Tourism क्लब
नवी दिल्ली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने (Central Tourism Ministry) शाळांमध्ये युथ टुरिझम क्लब (Tourism Club) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत देशातील शालेय विद्यार्थी आता पर्यटन दूत (Tourist Ambassador ) बनून त्यांच्या आजूबाजूच्या पर्यटन स्थळांचा प्रचार करणार आहे. ही योजना सीबीएसई बोर्डाच्या शाळांमधून सुरू होणार असून, यामध्ये इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी या क्लबचा भाग असणार आहे. तसेच याअंतर्गत विद्यार्थ्यांना जवळपासची पर्यटन स्थळे दत्तक घेता येणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या शाळांमधून (CBSC School) ही योजना सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर इतर शाळा आणि उच्च शैक्षणिक संस्थादेखील यामध्ये जोडल्या जाणार आहेत. (Youth Tourism In Schools )
हेही वाचा: मोठी बातमी! पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू, तासाभरानंतर वाहतूक सुरळीत
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शाळांमध्ये युवा पर्यटन क्लब स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना पर्यटनाची जाणीव व्हावी, त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या पर्यटन स्थळांची माहिती व्हावी आणि लोकांनी जागरुक व्हावे हा यामागचा उद्देश आहे, असे केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांना देशाचा समृद्ध ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आणि भौगोलिक माहिती याशिवाय विविध राज्यांतील भाषा, बोली संस्कृती आणि पर्यटनस्थळांची माहिती करून देणे हा यामागचा उद्देश आहे. याशिवाय विद्यार्थी स्वयंसेवक बनूनही पर्यटकांना पर्यटनस्थळांच्या स्वच्छतेबाबत जागरूक करू शकणार आहेत.
हेही वाचा: घरबसल्या अनुभवा साहसी पर्यटन; विशेष मालिकेत पाहा आतापर्यंत न पाहिलेली ठिकाणे
रेड्डी म्हणाले की, विद्यार्थी नागरिकांमध्ये पर्यटन स्थळांचा प्रचार करण्याबरोबरच ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ऐतिहासिक वारशाचा प्रचार करतील. देशातील समृद्ध सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि नैसर्गिक वारसा पुढे नेण्यासाठी तरुणाईची सर्वाधिक मदत होईल असे रेड्डी यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थी कसं काम करणार?
बारावीचे विद्यार्थ्यी टुरिझम क्लबच्या उपक्रमांचे कॅलेंडर तयार करतील. दर महिन्याला बैठक घेऊन आढावा घेतील आणि अहवाल शाळा व्यवस्थापनाला सादर करण्याचे काम करतील.
अशा प्रकारे चालेल क्लबचे काम
किमान 25 मुले टुरिझम क्लबचे सदस्य असणे आवश्यक आहे.
निबंध लेखन, लोगो डिझायनिंग, प्रश्नमंजुषा, ड्रॉइंग, पोस्टर मेकिंग, वादविवाद स्पर्धा आदी गोष्टी दर आठवड्याला किंवा 15 दिवसांनी आयोजित कराव्या लागतील.
ऑफ सीझनमध्ये मुलं गट करून पर्यटनस्थळी जातील जेणेकरून स्थानिक व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकेल.
शाळेच्या आसपास पर्यटन स्थळांना दत्तक घ्यावे लागेल. तसेच स्वयंसेवक बनून मदत करावी लागेल.
हेही वाचा: पर्यटन विकासाला रेल्वेचा बूस्टर; आता देशभर धावणार १९० ‘भारत गौरव’ विशेष गाड्या
11वीचे विद्यार्थ्यी कसं काम करणार
शाळेच्या आत आणि बाहेर आयोजित करण्या त येणाऱ्या उपक्रमांसाठी जबाबदारी संभाळतील. तसेच सर्व घडामोडींवर देखरेख करण्याचे काम करतील.
शिक्षकांशी संवाद साधून पर्यटनाला चालना देण्यासाठी अभ्यासक्रमाच्या उपक्रमाची आखणी करतील.
पंतप्रधानांनी तरुणांना केले होते आवाहन
'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'देखो अपना देश'मधील किमान 15 भारतीय पर्यटन स्थळांना भेट देण्याचे आवाहन लोकांना, विशेषतः तरुणांना केले होते. परदेशापेक्षाही भारतात चांगली पर्यटनस्थळे आहेत, असे पंतप्रधान म्हणाले होते. तसेच यावेली त्यांनी तरुणांना आवाहन केले होते की, त्यांनी परदेशात न जाता आपल्या देशातील समृद्ध ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा वारसा जाणून घ्यावा. याद्वारे तरुणांना भारत जाणून घेण्याची संधी मिळेत. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे म्हणत स्वावलंबी भारतासाठी तरुणांनी अशा योजना पुढे नेल्या पाहिजेत असेदेखील मोदींनी संवाद साधताना स्पष्ट केले होते.
Web Title: Azadi Ka Amrit Mahotsav Youth Tourism Clubs Will Open In Schools
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..