केरळमध्ये पावसामुळे 28 जणांचा मृत्यू 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जुलै 2018

केरळमध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय आज कन्नूर जिल्ह्यात एक जण वाहून गेला. राज्याच्या काही भागात पाऊस थांबल्यामुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी अनेक ठिकाणी पाणी साठल्याने सामान्य जनजीवन विस्कळित झाले आहे. आत्तापर्यंत 86 हजार 598 नागरिकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय आज कन्नूर जिल्ह्यात एक जण वाहून गेला. राज्याच्या काही भागात पाऊस थांबल्यामुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी अनेक ठिकाणी पाणी साठल्याने सामान्य जनजीवन विस्कळित झाले आहे. आत्तापर्यंत 86 हजार 598 नागरिकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

राज्यात 569 मदत शिबिरे सुरू करण्यात आली असून, अल्लापुझहामध्ये सर्वाधिक 194 शिबिरे सुरू करण्यात आली असून तेथे 11 हजार 90 कुटुंबांनी आश्रय घेतला आहे, असे नियंत्रण कक्षाने स्पष्ट केले आहे. त्याशिवाय कोट्टायम जिल्ह्यात 156 मदत शिबिरे सुरू केली असून सात हजार 856 कुटुंबांनी तेथे आश्रय घेतला आहे. कोट्टायम आणि अलापुझहा जिल्ह्यातील पाण्याची पातळी कमी होत नसल्यामुळे तेथील नागरिकांना मदत शिबिरात रात्र काढावी लागत आहे. विद्यापीठाने आज आणि उद्या होणाऱ्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Web Title: 28 deaths due to heavy rain in Kerala