

Why Doctor Radhika Kotdia Ended Her Life Before Engagement
Esakal
गुजरातमध्ये सूरत शहरात एका २८ वर्षीय डॉक्टर तरुणीनं इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलंय. सूरतमधील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या वेसू इथं २८ वर्षीय डॉक्टर राधिका कोटडिया हिनं एका कॅफेच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली. तिचा जागीच मृत्यू झाला. डॉक्टर राधिका एका खासगी रुग्णालयात काम करत होती. तिचा साखरपुडा होणार होता. प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आलीय की तिचा होणाऱ्या पतीशी वाद सुरू होता. याच मानसिक तणावातून हे पाऊल उचललं आहे.