ए. राजा, कनिमोळींना दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने मागील वर्षी डिसेंबरमध्ये 2 जी स्पेक्‍ट्रम प्रकरणातील मुख्य आरोपी ए. राजा आणि कनिमोळी यांच्यासह सुमारे 19 लोकांना दोषमुक्त केले होते. त्यावेळी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे सांगितले होते.

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने 2 जी स्पेक्ट्रम गैरव्यवहारप्रकरणी माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुक खासदार कनिमोळी यांच्यासह अन्य काही जणांविरोधात नोटीस जारी केली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 25 मेला घेण्यात येणार आहे. 

Delhi high courts

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने मागील वर्षी डिसेंबरमध्ये 2 जी स्पेक्‍ट्रम प्रकरणातील मुख्य आरोपी ए. राजा आणि कनिमोळी यांच्यासह सुमारे 19 लोकांना दोषमुक्त केले होते. त्यावेळी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार याविरोधात ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने ए. राजा, कनिमोळींना नोटीस जारी केली आहे. तसेच याप्रकरणाची पुढील सुनावणी 25 मे रोजी घेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. 

Web Title: 2G case Delhi HC notice to A Raja Kanimozhi and others on CBI plea against their acquittal