esakal | जम्मू-काश्मीरला मिळाली '2G' कनेक्टीव्हीटी!
sakal

बोलून बातमी शोधा

2g Mobile Connectivity In Jammu Kashmir.jpg

जम्मू-काश्मिरमध्ये तब्बल पाच महिन्यानंतर जम्मू भागातील पाच जिल्ह्यांमध्ये '2G' इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा पोस्टपेड मोबाईलपमरतीच मर्यादित असेल. 

जम्मू-काश्मीरला मिळाली '2G' कनेक्टीव्हीटी!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मिरमध्ये तब्बल पाच महिन्यानंतर जम्मू भागातील पाच जिल्ह्यांमध्ये '2G' इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा पोस्टपेड मोबाईलपमरतीच मर्यादित असेल. 

अभिनेता सिद्धार्थ म्हणतोय, भाजपवाल्यांनो सर्व 'विंडोज' फोडून टाका

'2G' इंटरनेट सेवा ही जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर व रियासी या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच हॉटेल, रूग्णालये व काही संस्थांमध्ये ब्रॉडबॅण्ड सेवा सुरू करण्यात आली आहे. या संबंधीचे आदेश 15 जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत. ते सात दिवसांपर्यंत लागू असतील.

गृहमंत्रालयाकडून यासंबंधी आदेश जारी करण्यात आले. गृहविभागाकडून सांगण्यात आले की, काश्मीरमध्ये अतिरिक्त 400 इंटरनेट कियोस्क स्थापन केले जातील. शासकीय कार्यालये, ई-बँकिंगसाठी ही ब्रॉडबँण्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

गांधींवर टीका केली अन् योगेश सोमणांना पाठविले सक्तीच्या रजेवर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था व सद्यस्थितीची पडताळणी केली जम्मू विभागात मोबाइल इंटरनेट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.