अभिनेता सिद्धार्थ म्हणतोय, भाजपवाल्यांनो सर्व 'विंडोज' फोडून टाका

वृत्तसंस्था
Wednesday, 15 January 2020

भारतात सीएएवरून दररोज आंदोलने होत आहेत. नडेला यांनीही याविषयी मत व्यक्त केले होते. बझफीडचे प्रमुख बेन स्मिथ यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली होती.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी भारतात जे काही सुरु आहे त्यावर खंत व्यक्त केल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ याने सत्ताधारी भाजपला उपरोधिक टोला लगावत सर्व विंडोज फोडून टाका असे म्हटले आहे.

गांधींवर टीका केली अन् योगेश सोमणांना पाठविले सक्तीच्या रजेवर

भारतात सीएएवरून दररोज आंदोलने होत असताना नडेला यांनीही याविषयी आपले मत व्यक्त केले होते. बझफीडचे प्रमुख बेन स्मिथ यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली होती. स्मिथ म्हणाले, की सत्या नडेला यांना भारतात लागू करण्यात आलेल्या सीएए विषयी विचारले असता त्यांनी भारतात सुरु असलेले आंदोलन दुःखद असल्याचे म्हटले आहे. भारतात हे काही होत आहे ते चुकीचे आहे. जर एखादा बांगलादेश निर्वासित भारतात इन्फोसिससारख्या एखाद्या कंपनीचा सीईओचा झाल्यास मला आनंदच होईल. नडेला यांनी मॅनहॅटन येथे झालेल्या मायक्रोसॉफ्टच्या कार्यक्रमात आपले मत मांडले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बेन स्मिथ यांच्या ट्विटला रिट्विट करत सिद्धार्थने भाजपला टोला लगाविला आहे. त्याने म्हटले आहे, की “ते (सत्या नाडेला आणि मायक्रोसॉफ्ट) देशविरोधी आहेत. त्यामुळे सगळ्या विंडोज फोडा.” यापूर्वीही सिद्धार्थने सरकारविरोधात ट्विट केलेले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Siddhartha criticized Satya Nadella on his statement of CAA