Coronavirus : देशात दररोज ५५ हजारांपेक्षा जास्त चाचण्या : डॉ. हर्षवर्धन

वृत्तसंस्था
Friday, 24 April 2020

भारत सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या करण्यावर भर देत आहे. देशात सध्या दररोज ५५ हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

नवी दिल्ली : भारत सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या करण्यावर भर देत आहे. देशात सध्या दररोज ५५ हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. तसेच, आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. जगाच्या तुलनेत आपला मृत्यूदर ३ टक्के आहे तर केस दुप्पट होण्याचा दरही ८.७८ टक्क्यांच्या जवळपास असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

काल (ता. २३) डॉ. हर्षवर्धन यांनी अन्य देशांच्या आरोग्यमंत्र्यांसह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी ६ क्षेत्रातील ६ देशांनी माहितीचं सादरीकरण केलं. दक्षिण पूर्व आशिया मार्फत डॉ. हर्षवर्धन यांनी माहितीचं सादरीकरण केलं. कोरोना व्हायरसनं देशात थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या चाचण्या होणं हे सर्वात मोठं हत्यार असल्याचं म्हटलं जात आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनंदेखील (आयसीएमआर) ही माहिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवरच भारत हा चाचण्या वाढविण्यावर भर देत आहे.

असे होतात कोरोनाग्रस्तांवर उपचार

दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगला आम्ही सोशल वॅक्सिन म्हणून वापर करण्यास सांगत असल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले. तसेच देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून २१ हजार ७०० वर पोहोचली असल्याचंही त्यांनी सांगितले. तसेच सध्या भारतातच पीपीई किटचं उत्पादन करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Increased Test Facilities 55 Thousand Per Day Coronavirus says Health Minister

Tags
टॉपिकस
Topic Tags: