तमिळनाडूमध्ये स्फोटात 3 जण ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

स्फोटामुळे कारखान्याची इमारत कोसळली असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. परवाना असलेल्या या कारखान्यात गेल्या पंधरा वर्षांपासून येथे स्फोटके बनविण्यात येतात.

तिरुचिरापल्ली - तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील उप्पीलियापुरम येथील स्फोटकांच्या कारखान्यात आज (गुरुवार) सकाळी झालेल्या भीषण स्फोटात तीन जण ठार झाले असून, 9 जण जखमी झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील उप्पीलियापुरम येथे असलेल्या स्फोटकांच्या या कारखान्यात आज सकाळी पावणेआठच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यावेळी कारखान्यात 12 जण काम करत होते. यातील तिघांचा मृत्यू झाला असून, दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यात येत आहे. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

स्फोटामुळे कारखान्याची इमारत कोसळली असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. परवाना असलेल्या या कारखान्यात गेल्या पंधरा वर्षांपासून येथे स्फोटके बनविण्यात येतात.
 
Web Title: 3 dead in blast at Tiruchi explosives unit