
Video : आसाममध्ये पावसाचा हाहाकार, नद्यांना पूर; ३ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंशाच्या वर पोहोचला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण आहेत. मात्र, आसाममध्ये पावसाने (Asam Rain) धुमाकूळ घातला आहे. नद्यांना पूर आला असून अनेक गावांमध्ये भूस्सखलन (Landslide) झाले आहे. यामध्ये ३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा: Asani Cyclone : आंध्र प्रदेशात तुफान पाऊस, महाराष्ट्रात ढगाळ वातावरण
आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. दिमा हासाओ जिल्ह्यातील हाफलांग भागात शनिवारी भूस्सखलनाची घटना घडली. यामध्ये एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला. दिमा हासाओ जिल्ह्यातील १२ गावांमध्ये भूस्खलनाची नोंद झाली आहे. सुमारे 80 घरांचे नुकसान झाले आहे. याबाबत आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने माहिती दिली आहे.
आत्तापर्यंत, कचार, धेमाजी, होजाई, कार्बी आंगलाँग पश्चिम, नागाव आणि कामरूप (मेट्रो) या सहा जिल्ह्यांतील 94 गावांतील एकूण 24,681 लोक पुरामुळे प्रभावित झाल्याचे आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले. तसेच मुसळधार पावसामुळे हाफलांग भागात रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
दरम्यान, दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरयाणा, महाराष्ट्रात तापमानाचा पारा ४० अंशाच्या वर पोहोचला आहे. नागरिक उकाड्यामुळे हैराण आहेत. पण, काही दिवसांतच नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, पुढील ४८ तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होणार आहे. त्यामुळे देशभरात लवकरच पाऊस बरसणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Web Title: 3 Died Landslide Heavy Rain In Asam
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..