
Asani Cyclone : आंध्र प्रदेशात तुफान पाऊस, महाराष्ट्रात ढगाळ वातावरण
नवी दिल्ली : सध्या असनी चक्रीवादळाचं संकट आहे. यामुळे आंध्र प्रदेशला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यात आज सकाळपासूनच वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवर देखील होणार आहे. त्याबाबत हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. (Asani Cyclone Updates)
हेही वाचा: असनी चक्रीवादळाचा प्रभाव; मॉन्सूनसाठी करावी लागणार प्रतीक्षा
असनी चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील काही भागांवर होणार आहे. राज्यात कोकणात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगलीत देखील ढगाळ वातावरण आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
हवामान विभागानुसार, सध्या चक्रीवादळ वायव्येकडे सरकण्याची आणि पुढील काही तासांपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपासून पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने 10 ते 1२ या कालावधीत पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात आणि 10 ते 12 मे या कालावधीत उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात मासेमारीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. यासोबतच समुद्रातील मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणारी वाहतूक रोखून धरली आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली, असं आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील थिम्मापुरम पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रामा कृष्णा यांनी सांगितले.
Web Title: Asani Cyclone Effect Heavy Rainfall In Adhra Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..