
Siachen Avalanche
ESakal
जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरमधून एक दुःखद बातमी आली आहे. येथे मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झाले आहे. तेथे तैनात असलेले भारतीय लष्कराचे जवानही हिमस्खलनाच्या विळख्यात सापडले आहेत. या दुर्घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत. लष्कराच्या अधिकाऱ्यांना हिमस्खलनाची माहिती मिळताच, तातडीने घटनास्थळी बचाव पथक पाठवण्यात आले.