esakal | जम्मू काश्मीर पोलिसांकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा; 1 जवान जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

3 terrorist killed by J&K police in Shrinagar highway.jpg

तीन दहशवाद्यांना ठार करण्यात जवानांना यथ आले आहे. या चकमकीत एक जवान जखमी झाला असल्याची माहिती, पोलिस माहानिरीक्षक मुकेश सिंह यांनी सांगितले. 

जम्मू काश्मीर पोलिसांकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा; 1 जवान जखमी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील नगरोटा येथे जम्मू-श्रीनगर महामार्गावर भारतीय जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात तीन दहशवाद्यांना ठार करण्यात जवानांना यथ आले आहे. या चकमकीत एक जवान जखमी झाला असल्याची माहिती, पोलिस माहानिरीक्षक मुकेश सिंह यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज (ता. 31) पहाटे पाचच्या दरम्यान नगरोटा येथील बान टोल प्लाझावर एका ट्रकला तपासणीसाठी थांबविण्यात आले असता, पोलिसांना आत दहशतवादी असल्याचा संशय होता. पण, ट्रकमधूनच जवानांवर गोळीबार सुरू झाला व त्याचे प्रत्युत्तर म्हणून जवानांनी गोळीबार केला. यात प्रथम एक दहशतवादी ठार झाला. त्यानंतर इतर तिघांना घेराव घालण्यात आला व त्यांनाही मारण्यात आले. आणखी चार दहशतवादी या परिसरात लपून बसले असल्याचा संशय पोलिसांना असून, त्याप्रमाणे शोधकार्य सुरू आहे. 

आठ तासांनी थरारनाट्य संपलं! उत्तर प्रदेशातील माथेफिरूचा खात्मा; 15 मुलांची सुटका

मिळालेल्या माहितीनुसार, टोल प्लाझाजवळ दोन स्फोटही करण्यात आले. ट्रकमधील दहशतवाद्यांनी लष्काराला चकवण्यासाठी जवानांचा गणवेश घातला होता. मात्र, पोलिसांना आलेल्या संशयामुळे त्यांनी ट्रक थांबवून पडताळणी केली व दहशतवाद्यांचा खात्मा केला.