वॉशिंग मशीनमध्ये पडून जुळ्या भांवडांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - वॉशिंग मशीनमध्ये बुडून तीन वर्षांच्या दोन जुळ्या भावंडांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - वॉशिंग मशीनमध्ये बुडून तीन वर्षांच्या दोन जुळ्या भावंडांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

राजधानी दिल्लीतील रोहिणी शहरात अवंतिका हौसिंग सोसायटीत ही घटना घडली. सोसायटीत पहिल्या मजल्यावर राखी आणि रविंद्र नावाचे दांपत्य राहते. त्यांना लक्ष आणि निशू ही तीन वर्षांची जुळी मुले होती. तर आदित्य नावाचा दहा वर्षांचा एक मुलगा आहे. घरातील कामे आवरून वॉशिंग मशिनमध्ये पाणी ओतून राखी वॉशिंग पावडर आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी रविंद्र ऑफिसला तर आदित्य शाळेत गेला होता. राखीने जाताना घरात खेळत असलेल्या लक्ष आणि निशूला घरातच ठेवले. मात्र अवघ्या सहा मिनिटांनी घरी परतल्यावर राखीला दोघे घरात कोठेच दिसले नाही. तिने रविंद्रला फोन करून घरी बोलावले. दोघांनी संपूर्ण इमारतीत शोध घेतल्यानंतर सहजपणे घरातील वॉशिंग मशीन उघडली. त्यामध्ये हे दोघेही बुडालेले आढळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्राथमिक तपासात त्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

वॉशिंग मशीनच्या उंचीपर्यंत मुले पोहोचली कशी, याबद्दल राखी आणि रविंद्रने शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: 3-year-old twins found dead in washing machine