30-35 टक्के अल्पसंख्यांक भाजपला मतदान करतील : नक्वी 

वृत्तसंस्था
रविवार, 8 जुलै 2018

''मुस्लिमांसह 30-35 टक्के अल्पसंख्यांक 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मतदान करतील''.

- मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री

नवी दिल्ली : विरोधकांकडून 'भीतीदायक वातावरण' निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले, की ''मुस्लिमांसह 30-35 टक्के अल्पसंख्यांक 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मतदान करतील''.

याबाबत नक्वी यांनी सांगितले, की एनडीए सरकार अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी काम करत आहे. या अल्पसंख्यांक समाजासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाच्या दृष्टीने काम करत आहे. भाजप जेव्हा 2014 मध्ये सत्तेवर आले. त्यानंतर विरोधी पक्षांकडून 'भीतीदायक वातावरण' निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच गेल्या 70 वर्षांमध्ये विष पेरण्यात आले, असे आम्ही म्हणत नाही. मात्र, आता भाजपकडून अल्पसंख्यांकांसाठी सकारात्मक बाबी केला जात आहेत.

दरम्यान, 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 18-20 टक्के अल्पसंख्यांक समाजातील लोकांनी पंतप्रधान मोदींना मतं दिली, असेही नक्वी म्हणाले. तसेच आम्ही अपेक्षा करतो, की 2018 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये 30-35 अल्पसंख्यांक समाजाकडून मते मिळतील. भाजपला अल्पसंख्यांक समाजातील मते देऊन देशाच्या विकासाच्या प्रवासात साथ द्यावी, असेही नक्वी म्हणाले. 

Web Title: 30 35 percent Minorities To Vote For BJP In 2019 Polls says Mukhtar Abbas Naqvi