बीएसएफच्या 30 जवानांना कोरोनाची लागण

वृत्तसंस्था
Wednesday, 6 May 2020

अंतर्गत सुरक्षा ड्यूटीवर दिल्लीच्या वॉल्ड सिटी भागात तैनात केलेल्या बीएसएफच्या तुकडीतील 30 जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी आज (बुधवार) दिली.

जोधपूर (राजस्थान) : अंतर्गत सुरक्षा ड्यूटीवर दिल्लीच्या वॉल्ड सिटी भागात तैनात केलेल्या बीएसएफच्या तुकडीतील 30 जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी आज (बुधवार) दिली.

...म्हणून झाडावर केले स्वतःला क्वारंटाईन!

या जवानांमध्ये कोरोना सदृष्य लक्षणे दिसू लागल्याने त्यांना सोमवारी बीएसएफच्या साहाय्यक प्रशिक्षण केंद्रातील (एसटीसी) विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या ठिकाणी मंगळवारी या जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली होती आणि त्याचे नमुने एम्स रुग्णालयाकडे पाठवण्यात आले होते. त्याच अहवाल बुधवारी सकाळी आला ज्यामध्ये या जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या सर्वांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दारूड्याने सापाला धमकावले अन् तोडले लचके...

दरम्यान, जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या संपूर्ण तुकडीला जोधपूरला एअर लिफ्ट केले गेले असून याठिकणी असलेल्या बीएसएफच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्रातील (एसटीसी) विलगीकरण कक्षात त्यांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 bsf jawans test positive for coronavirus